Events

संस्थानने आजपर्यंत राबवलेले उपक्रम

१) गोशाळा व गोरक्षण

२) वेद विद्यालय


३) भक्तनिवास व पार्किंग व्यवस्था


४) शाश्वत व एकदिवसीय पुजासेवा

५) अन्नदान

६) उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा

७) मेडिकल कँम्प्स्

८) नवोदित व व्यावसायिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.

९) नँशनलकँलामिटीच्या वेळी देशासही आर्थिक मदत

१०) जवळपास ३०० गरजुंना लाँकडाऊन दरम्यान दररोज घरपोच भोजन व्यवस्था

११) कोरोना दरम्यान क्वारंटाईनसाठी कारंजा तहसीलला संस्थान कडून जागा उपलब्ध करुन देण्यात आली.

१२) राष्ट्रीय आपत्तिच्यावेळी संस्थानकडून रोख रक्कमेची मदत खिल्लारी भुकंप, कारगिल, कोल्हापुर नैसर्गिक आपत्ती ११,००,०००/-, कोरोना जागतिक महामारी करीता प्रधानमंत्री सहाय्यता निधी २१,००,०००/-

१३) अत्यल्प दरात ना नफा- ना तोटा ह्या तत्वावर रुग्णवाहिका संस्थानने तर्फे  उपलब्ध.


१४)सद्भक्तांना अभ्यासासाठी हिंदू धर्मातील साहित्य/ ग्रंथांनी सुसज्जीत  वाचनालय

१५)शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाकरीता तज्ञ शेतीनिष्ठ व्यावसायिकांचे शेतकरी मेळावा

१६ ) श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानाचा सामान्य विमा United India Insurance Company Ltd. चे उपमहाव्यवस्थापक श्री. अनिल मालोंडकर यांचे हस्ते श्री. अविनाश खेडकर यांच्या सुपूर्द करण्यात आला. श्री. राजेश टिकले व्यवस्थापक United India Insurance Company Ltd. हेदेखील यावेळी उपस्थीत होते.

१७) || श्रौत याग ||

“यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म”।
वैदिक याग म्हणजेच श्रौत याग.

श्रौत यागाने विश्व कल्याण साध्य होवू शकते. श्रौत ही आदर्श जीवन शैली आहे. श्रौत यागाने पर्यावरणाचे संतुलन होते आणि सकस अन्न निर्माण होते, ज्या योगे प्रजेचे सुयोग्य भरण पोषण होते. तसेच या यागा मुळे निर्माण होणाऱ्या अत्यंत सकारात्मक ऊर्जेमुळे आणि वैदिक मंत्रांच्या उच्चारामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सक्षम व पुष्ठ होते.
ज्या योगे संतुष्ठ आणि समाधानी समाज, पुष्ट अर्थ व्यवस्था आणि राज्य व्यवस्था संपादन केली जावून सशक्त राष्ट्र निर्मिती साध्य होऊ शकते. असे याग आता लुप्त होत आहेत,
अश्याच एका दुर्मिळ श्रौत यागाचे आयोजन आपल्या सर्वांचे गुरुस्थान श्रद्धास्थान श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ( श्री गुरुमंदिर ) महासंस्थानाद्वारे संपन्न झाला.